Bopkhel : दहा लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – दहा लाख रुपयांची मागणी करत चौघांनी एका (Bopkhel)बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सप्टेंबर 2023 ते 21 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बोपखेल चौक, बोपखेल येथे घडली.

अतुल घुले, अमोल गिरी (दोघे रा. बोपखेल), दिवाकर सुरेंद्र सिंग (रा. धानोरी, पुणे), अक्षय गवळी (रा. गवळीवाडा, खडकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक स्वप्नील अविनाश घुले (वय 35, रा. बोपखेल चौक, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : ग्राहकांनी नवीन घरासाठी दिलेले 21 लाख रुपये घेऊन सेल्स पर्सन फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Bopkhel)अतुल घुले याच्या सांगण्यावरून अन्य आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादी यांनी बांधकाम केलेल्या प्लॉटवरील मालकाच्या नावे असलेले दुकान कमी किमतीत विकून वरची 10 लाख रुपये रक्कम आम्हाला दे. रक्कम दिली नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.