Bopodi Crime News : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून 17 वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून 17 वर्षीय मुलाला कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. आयटी पार्क समोरील रस्त्यावर, भाऊ पाटील रोड, बोपोडी याठिकाणी मंगळवारी (दि.27) सकाळी सात वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी बोपोडी येथील 17 वर्षीय मुलाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार इसमांविरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 323, 504, 506 (2), 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलासोबत क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून त्यांना चार जणांनी कोयता व हाताने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.