Borghat Accident News : बोरघाटात भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत दोन ट्रक पडले दरीत, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : बोरघाटात आज भीषण अपघात (Borghat Accident News) झाल्याची घटना घडली. एका ट्रेलरने 4 वाहनांना धडक दिली असून 2 ट्रक दरीत पडले, तर यामध्ये ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे पुणे- मुंबई दृतगती मार्गावर ही घटना घडली.

या अपघातात ट्रेलर क्र. MH 46 BM 9397 वरील चालक अजित जाधव (रा. सांगली) यास गंभीर दुखापत झाली असल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच, ट्रक क्र KA 51 AG 5978 वरील चालक मंगळू हा जखमी झाला आहे.

आज पहाटे साडेचारच्या दरम्यान (Borghat Accident News) पुणे-मुंबई लेन किमी 37.500 येथे हा अपघात झाला. अजित जाधव हा पुण्यातून मुंबई बाजूकडे जात असताना त्याच्या गाडीचा टायर फुटल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याच्या बाजूने जाणाऱ्या टेम्पोला (क्र. MH 13 DQ 3101) त्याने आधी धडक दिली व त्यानंतर डाव्या बाजूकडील ट्रकला (क्र. KA 39 A 0344) धडक दिली. त्यामुळे हा ट्रक पलटी झाला.

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग होतोय का मृत्यूचा सापळा? दहा महिन्यात झाले ‘इतके’ अपघात!

या वाहनांची केबिन तुटल्याने वाहने 100 फूट खोल दरीत पडले. चालक मंगळू हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्यास देवदूत टीमच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचाराकरिता IRB रुग्णवाहिकेने MGM हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तसेच, मृत्यू झालेल्या चालकास खोपोली येथे नगर पालिका हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. अपघातातील वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने वाहतुकीस अडथळा झाला नाही व वाहतूक सुरळीत चालू आहे.

अपघाता ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन, म.पो.केंद्र बोरघाट पोलीस स्टाफ तसेच देवदूत व IRB टीम हजर आहे. म.पो.केंद्र बोरघाट पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.