Bhosari News : महारक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद, 719 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे भोसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 719 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पुणे – नाशिक हायवे, भोसरी येथे इंद्रायणी मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे,’ फ ‘ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेवक राजेंद्र लांडगे, भाजपा पदाधिकारी विजय फुगे, दत्ता गव्हाणे, व्यवसायिक कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते.

वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी तसेच विधायक कार्यक्रम करण्याच्या सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या होत्या. कोरोना काळात अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले होते. रक्तदानाला श्रेष्ठदान असे संबोधले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशा भावना यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

या शिबिरात 719 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

अनेकांना जीवनदान देण्याचे पुण्य कार्य – आमदार लांडगे

भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय विधायक असा उपक्रम राबवला. यामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. या कामातून अनेकांना जीवनदान देण्याचे पुण्य कार्य माझ्या कार्यकर्त्यांच्या हातून घडले आहे. अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.