Nigdi : गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 15 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि 30 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई अप्पूघर कॉर्नरजवळ ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणा-या रस्त्यावर निगडी पोलिसांनी केली.

इर्शाद बकरीदी शेख (वय 23, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे. मूळ रा. श्रवणपूर, निदौरा, ता. खागा, जि. फत्तेपूर, उत्तरप्रदेश) आणि दीपक रामबाबू मिश्रा (वय 27, रा. पवारवस्ती, ताथवडे. मूळ रा. चौखटा, ता. मजा, जि. इलाहाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याचे तपास पथक घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्याबाबत निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. अप्पूघर कॉर्नरजवळ ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणा-या रस्त्यावर दोघेजण एका दुचाकीवरून जात आहेत. त्यांच्याजवळ गावठी कट्टा आहे. अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून इर्शाद आणि दीपक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता एक गावठी कट्टा मिळून आला. यावरून दोघांना अटक करण्यात आली असून गावठी कट्टा आणि दुचाकी असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, रवींद्र जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल एन सोनवणे, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, किरण खेडकर, मंगेश गायकवाड, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, सुनील शिंदे, फारूक मुल्ला, रमेश मावसकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, सागर शेंडगे, शरीफ मुलाणी, नाणेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.