Chakan News : कर्जाच्या व्याजासाठी त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – दिलेल्या कर्जाच्या अधिकच्या व्याजासाठी त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारकासिटी रो हाऊस, म्हाळुंगे या ठिकाणी 04 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. 

धनंजय बाबुराव रेड्डी (वय 30) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ योगेश बाबुराव रेड्डी (वय 44, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दाखल फिर्यादीवरून सुरज चंद्रकांत गजरे (रा. हवेली) व त्याचा मित्र यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 365, 341, 306, 34, सावकारी कायदा कलम 39, 45 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या धनंजय रेड्डी यांनी आरोपी सुरज गजरे यांच्या कडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या रकमेच्या अधिकच्या व्याजासाठी आरोपीने मानसिक त्रास दिला व आरोपीच्या मित्राने धनंजय यांना मारहाण केली. या त्रासाला कंटाळून धनंजय यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.