Sangvi : पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची तक्रार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रस्ता खोदून पाईपलाईनचे नुकसान केल्याप्रकरणी आणि अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 24 जुलै 2019 दरम्यान नवी सांगवी येथे घडला.

आरती कोळपकर (रा. स्वामी विवेकानंदनगर, सांगवी), शैलेश एकांबरी बासुंदरक अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सदाशिव पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरती कोळपकर आणि शैलेश बासुंदकर यांनी सप्टेंबर 2018 ते 24 जुलै 2019  पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा करणा-या पाईपला अनधिकृतपणे नळजोडणी केली. तसेच महापालिकेचा रस्ता खोदून पाईपलाईचे नुकसान केले. याबाबत महापालिकेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दोघांविरोधात पाणी चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.