Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना आंबी येथे घडली.
शंकर दत्तात्रय वाडेकर (वय २६ रा.इंदोरी ता. मावळ) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर तुषार भड (रा. नाशिक) या बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. राहुल माने (रा. सोलापूर) याचा जीव वाचला आहे.
