Thergaon News : पवना नदीत दोघे बुडाले; एकाचा मृतदेह आढळला, दुसर्‍याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज – थेरगाव स्मशानभूमी जवळ पवना नदीमध्ये रविवारी (दि. 14) दुपारी चारजण पडले. त्यातील दोघे सुखरूप बाहेर आले. तर दोघेजण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह आज (सोमवारी, दि. 15) सकाळी पाण्यावर तरंगताना दिसला. तर दुसर्‍या तरुणाचा शोध अग्निशमन विभागाकडून सुरू आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास चारजण थेरगाव स्मशानभूमी जवळ पवना नदीत पडले. त्यातील दोघेजण पोहून स्वतःहून बाहेर निघाले. तर दोघेजण पवना नदीत बुडाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर बुडालेल्या तरुणांपैकी दुसऱ्या तरुणाचा शोध अग्निशमन विभागाचे जवान घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.