Vadgaon News : महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित : जयंत पाटील

एमपीसीन्यूज – महाविकासआघाडीचे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहे. त्यामुळे नक्कीच निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त बुधवारी (दि.२५) वडगाव येथील ओरिटल हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, युवा नेते पार्थ पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, सुभाष जाधव, विठ्ठल शिंदे, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, मयुर ढोरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, जीवन गायकवाड, शिवसेना नेत्या शादान चौधरी, तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगिता शेळके, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, विलास मालपोटे, विशाल वहिले, अतुल राऊत, व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन संपर्क साधावा. आपला उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारा व स्वच्छ प्रतिमा असलेला आहे. त्यामुळे आपण एक चांगले नेतृत्व देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.

आमदार सुनील शेळके म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी व महाविकास आघाडीच्या उमेदवारास मावळातून सर्वाधिक मते मिळवून द्यावीत.

प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रजित वाघमारे व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले. आभार माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like