Pune : गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

पंच्याहत्तर हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गणेश पेठ येथून शनिवारी (दि.15) पोलिसांनी सापळा रचून अटक करून दोन गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे असा एकूण 75 हजार 500  रुपयांचा ऐवज जप्त केला. 

आकाश लहू तावरे (वय 21, रा. रांजे,भोर) व दीपक बाळासाहेब पासलकर (वय 25, रा. कुरुनबुद्रुक, वेल्हा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त फरासखाना येथे पोलीस गस्त घालत असताना पथकातील पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना खबऱ्याने गणेश पेठ येथे दोन इसम देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन येणार आहेत, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खबऱ्याने वर्णन सांगितल्याप्रमाणे आकाश व दीपक यांना पकडले व त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे, असा एकूण 75 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला.

याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुनिल पवार, वाहनचोरी विरोधी पथक हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.