Pune News: पुण्यात प्रेयसी फसवत असल्याची चिठ्ठी लिहून प्रियकराची आत्महत्या

एमपीसी न्यूज: पुण्यातील कोथरूड परिसरात एका 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडले असून त्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण दिले आहे. प्रेयसीने मला धोका दिला आणि तिच्या मामाने धमकी दिली त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले. 

प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या आईने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेयसी आणि तिचा मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 15 नोव्हेंबर रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाने 15 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रेयसी आपल्याला सोडून जाईल आणि ती आपली फसवणूक करत असल्याची भावना त्याच्या मनात होती. त्यामुळे तो तणावात होता. तर घटनेच्या दिवशी प्रेयसीच्या मामाने घरी येऊन त्याला शिवीगाळ केली होती आणि धमकीही दिली होती.

या सर्व प्रकाराने नैराश्यात गेलेल्या प्रशांतने त्याच दिवशी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली पोलिसांना सापडली आहे. त्यात त्याने ” त्या मुलीने मला धोका दिला, तिने मला फसवले, तिच्या मामाने धमकी दिली म्हणून मी हे केलं असा मजकूर लिहिलेला आहे.

कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.