मुलांनी भाकऱ्या थापून तर मुलींनी इलेक्ट्रीक वायर जोडून साधला स्त्री-पुरुष समानतेचा समन्वय

एमपीसी न्यूज – आई-वडील कामाला गेलेले असताना घरातील स्वंयपाक असो किंवा लाईटची कामे असो ती आम्ही सबहीण भाऊ करतो असे गर्वाने सांगत मुलांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. निमित्त होते. खेड तालुक्यातील मांजरेवाडी पिंपळ येथील एका अनोख्या उपक्रमाचे. जिथे 100 किशोरवयीन मुलांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुलांनी चुलीवर भाकऱ्या थापल्या तर मुलींनी इलेक्ट्रीक वायर जोडणी केली.

“घरकाम दोघांचे -अवकाश दोघांचे ” या स्त्री पुरुष समानता प्रस्थापीत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेने केले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून अहमदनगरची श्रद्धा ढवण ढोरमले व चैतन्य ढोरमले उपस्थित होते जिने दूध डेअरी हा पुरुषप्रधान मानला जाणारा दुग्ध व्यवसाय एकटीने सांभाळून दाखवला.याचबरोबर कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास, मांजरे वाडी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मुख्यध्यापक तसेच गावकरी उपस्थित होते.

PCMC: राज्य सेवेतील तिसरा अतिरिक्त आयुक्त नको; कर्मचारी महासंघाचे राज्य शासनाला पत्र

मानव जातीच्या विकासावर या लिंगभेदावर आधारीत अन्यायकारक सामाजिक चौकटीचा परिणाम होत आहे. ही चौकटी मोडून ज्याला जे काम करायला आवडेल ते करण्याची संधी असावी व मुलांनी आणि पुरुषांनी देखील घरकामात सहकार्य करून स्त्रियांना आपल्या सोबत बरोबरीने येण्याची संधी द्यावी हा संस्कार रुजविण्यासाठी हा प्रकल्प इथल्या १० गावांमधील युवांमध्ये राबविला जात आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही किशोरवयीन मुले अभिमानाने आम्हाला भाकरी येते आणि आम्ही भविष्यात सुद्धा आमच्या कुटुंबातील स्त्रियांना घरकामात मदत करू असे अभिमानाने सांगत होते. समाजात पुरुषांना घरकाम करण्यासाठी त्यांचा जो गर्व आड येतो, त्यांना कमी पणाचे वाटते, समाजात सुद्धा पुरुष भाकरी थापताना दिसल्यास हे चित्र सामान्य व्हावे म्हणुन हा प्रयत्न सुरू आहे श्रद्धा ने उपस्थित मुलांसोबत संवाद साधला आणि चौकटीच्या बाहेर जाऊन माणूस बनून आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे मत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन मी शक्ती प्रतिनिधी प्राची खंडागळे हिने केले. कार्यक्रमात प्रियांका, श्वेता, सुरज, गणेश, प्राजक्ता, स्वानंदी, शिल्पा, स्वाती या कार्यकर्त्यांनी प्रमुख भूमिका घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या कार्यक्रमाला तेरे देस होम्स आणि फॉक्सवेगन कंपनीचे सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.