BPCL News : भारत पेट्रोलियमच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी जी. कृष्णकुमार

एमपीसी न्यूज – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या (BPCL News) कंपनीने काल  जी. कृष्णकुमार यांनी कंपनीचे अध्यक्षपद आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्याचे जाहीर केले.

कृष्णकुमार हे या क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून कार्यरत असून त्यांच्याकडे बीपीसीएलमध्ये वेगवेगळ्या व्यवसाय आणि कार्यकारी विभागांचे नेतृत्व करण्याचा 36 वर्षांचा अनुभव आहे.

 

डाउनस्ट्रीम फ्युएल रिटेलिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बीपीसीएलच्या कामाच्या केंद्रस्थानी ते कार्यरत होते. त्यांनी कंपनीच्या ग्राहकाभिमुख उपक्रमांचे कन्व्हिनियन्स रिटेलिंग, प्रीमियम फ्युएल्समध्ये रुपांतर केले. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय तेल उद्योगात पहिल्यांदाच नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल उपक्रम सुरू केले.

 

Pune News : पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी 146 कोटींची थकबाकी; वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई

 कृष्णकुमार यांनी पेट्रो कार्ड, स्मार्टफ्लीट स्पीड, इन अँड आउट अशाप्रकारचे यशस्वी ब्रँड्स विकसित करून जोपासले. या ब्रँड्समुळे बीपीसीएलला ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा देणे आणि प्युअर ऑफ शुअरचे आश्वासन जपत बाजारपेठेत स्वतंत्र स्थान निर्माण करणे शक्य झाले.

बोर्डावर रूजू होण्यापूर्वी बीपीसीएलच्या ल्युब्रिकंट व्यवसायाचे प्रमुख या नात्याने त्यांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मॅक ब्रँडचा दमदार विकास केला तसेच नव्या व उभरत्या औद्योगिक, कृषी, प्रवासी आणि व्यावसायिक वाहन क्षेत्रांसाठी खास उत्पादन श्रेणी विस्तार घडवून आणला. मॅक ब्रँडच्या – मॅक क्विक या दुचाकीमधील तेल पटकन बदलण्यासाठीच्या उत्पादनाच्या माध्यमातून त्यांनी सेवा विस्तार केला. तेव्हापासून लाखो ग्राहकांनी या ब्रँडचा अवलंब केला आहे.

 

 

 कृष्णकुमार यांनी एनआयटी (पूर्वीचे रिजनल इंजिनियरिंग कॉलेज)  तिरूचिरापल्ली येथून  इलेक्टिक इंजिनियरची पदवी घेतली असून जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबईमधून त्यांनी आर्थिक (BPCL News) व्यवस्थापनात मास्टर्स केले आहे. ते उत्तम क्विझर आणि चोखंदळ वाचक आहे. क्रिकेट खेळाचे ते निस्सीम चाहते असून कुशल गोल्फरही आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.