PimpleGurav : ब्रह्म सेवा संघाच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. संपत गर्जे सन्मानित

एमपीसी न्यूज –  ब्रह्म सेवा संघाच्या वतीने  यावर्षीचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’  पिंपरी येथील भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. संपत गर्जे यांना भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

प्रा. संपत गर्जे यांना निगडी येथील स्वा. सावरकर सभागृहात हा पुरस्कार प्रदान कराण्यात आला. यावेळी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र प्रमुख वा. ना. अभ्यंकर, ब्रह्म सेवा संघाचे मकरंद बापट, संयोजक राजन लाखे,  प्रा. संतोष पाचपुते, उद्योगपती हंसराज पाटील, सतीश आचार्य, शब्दघनचे  डी. बी. शिंदे आदी उपस्थित होते.

प्रा. संपत गर्जे हे भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेली २५ वर्षे ‘मराठी’ विषयाचे अध्यापन करीत आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा. संपत गर्जे हे संत साहित्याचे अभ्यासक असून त्यांची प्रवचनकार म्हणून फार मोठी ख्याती आहे. तसेच साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य असून ते एक उत्कृष्ट कवी आहेत. महाराष्ट्रामध्ये ते अनेक शैक्षणिक विषयावर व्याख्याने व प्रवचने देतात.  सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1