Chinchwad News : ब्राह्मण महासंघाच्या वतीने 150 कुटुंबाना मास्क, सॅनिटायझर व दिवाळी फराळाचे वाटप

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ब्रम्हचैतन्य क्रेडिट सोसायटी काळेवाडी यांच्या वतीने 150 ब्राह्मण कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे प्रिंट केलेले मास्क,सॅनिटायझर  आणि दिवाळी फराळाचे पॅकेट भेट देण्यात आले. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. 

हा कार्यक्रम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदराव कुलकर्णी, प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की आणि प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या प्रेरणेने राबविण्यात आला.

महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी  क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकर कुलकर्णी पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस शामकांत कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बार्सावडे, शहराध्यक्षा शर्मिला महाजन, अनुपमा कुलकर्णी, पुष्कराज गोवर्धन, अनुराधा कुलकर्णी, राजन बुडुख, अंतरा देशपांडे, सुहास पोफळे, सुषमा वैद्य, राहुल कुलकर्णी आदी लोकांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.