International News : ब्राझीलने मानले भारताचे ‘असे’ आभार

एमपीसी न्यूज : भारतात तयार झालेल्या लसींची ब-याच देशांनी मागणी केली आहे. त्यामध्ये ब्राझीलचाही समावेश आहे. नुकताच भारताने ब्राझीलला लसींचा पुरवठा केला आहे. त्यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी एका आगळयावेगळ्या पद्धतीने भारताचे आभार मानले आहेत.

या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी भारतासारखा सहकारी आमच्याबरोबर आहे, हे ब्राझीलचं भाग्य. लसी या भारतातून ब्राझीलपर्यंत पोहोचवून आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. असे ट्विट करत त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. आणि याच फोटोला नेटीझन्सची पसंती मिळत आहे.

या फोटोमध्ये जगाचा नकाशा असून भारत आणि ब्राझील हे देश ठळक केले आहेत. यांत हनुमान हा भारतपासून ब्राझीलमध्ये येऊन लसी पुरवत आहे, असे दर्शवेले गेले आहे. आपल्याकडे रामायणामध्ये हनुमान हा लक्ष्मणाला वाचवण्यासाठी द्रोणागिरी गावातील पर्वतावरून नवसंजीवनी आणतो, असा उल्लेख आहे. त्याचाच संदर्भ घेत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘धन्यवाद भारत’ असे म्हणत भारताचे आभार मानले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी त्यांना उत्तर देत जैर बोल्सोनारो हे या कोविड-19 ची लढाई लढण्यासाठी एक विश्वासू सहकारी राहिले आहेत. आरोग्यसेवेसाठी आपले प्रयत्न आपण असेच बळकट करत राहू, असे म्हणले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.