Break The Chain : राज्यात संचारबंदी दरम्यान काय सुरू ? काय बंद ?

एमपीसी न्यूज – राज्यात उद्यापासून (बुधवार, दि.14) रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली असून, यादरम्यान कुणालाही कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहे.

जाणून घ्या 15 दिवसांच्या संचारबंदी दरम्यान काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार.

‘या’ सेवा सुरु राहणार

– सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे निर्बंधांसह सुरू राहणार

– सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार

– रुग्णालये व संबंधित सेवा, शीतगृहे, वेअर हाऊसिंग, बँका व सेबीशी संबंधित सेवा, दूर संचार सेवा, ई-कॉमर्स, पेट्रोल पंप सुरू राहणार

– हॉटेलमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहणार

– प्राण्यांचे दवाखाने सुरू राहणार

– शेतीविषयक सर्व कामं सुरू राहणार

– पोस्टल सेवा, एटीएम, गॅस, इलेक्ट्रिक सेवा सुरू राहणार

‘या’ सेवा राहणार बंद 

– अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

– अत्यावश्यक सेवा व उपक्रम वगळून उर्वरित सर्व सेवा बंद राहणार

– शाळा, महाविद्यालये, प्रार्थना स्थळे, खासगी शिकवणी, सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार

– सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम व मेळावे बंद

– सिनेमागृहे, स्विमिंग पूल, जिम बंद राहणार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.