Breaking News : संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले

एमपीसी न्यूज- संजय राऊत यांना (Breaking News) धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले. राहुल तळेकर (साधारण वय 23 ) असे  तरुणाचे नाव आहे. याला पुण्यातील खराडी भागातून गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले.

संजय राऊत यांना काल रात्री  त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला होता. हिंदू विरोधी. मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके 47 से उडा दूँगा. मुसेवाला टाईप. लॉरेन्स के और से मेसेज है. सोच ले XX सलमान और तू फिक्स, अशी धमकी या टेक्स्ट मेसेजमधून देण्यात आली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना  माहिती दिली होती.यासंदर्भात असून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

त्याच संदर्भात  मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने (Breaking News) काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून  राहुल तळेकरला ताब्यात घेण्यात आले.मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत. पोलीसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.