TRP scam news : टीआरपी घोटाळा प्रकरणी ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुण्यात अटक !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज, गुरुवारी मुंबई पोलीसांची छापेमारी झाली. यामध्ये टीआरपी घोटाळा प्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस आणि मुंबई पोलिसांनी रायगडमधून ताब्यात घेत पुण्यात अटक केली. 

रिपब्लिक भारत, वावू सिनेमा आणि फक्त मराठी आदी चॅनेलला बनावट खोटे टीआरपी देत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चौकशी झाली होती. त्यामधील आरोपींचे अटकसत्र सुरू झाले होते.

त्यामधील मुख्य सुत्रधार म्हणून ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांची शोधमोहीम सुरू झाली होती. अखेर पुण्यात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत दासगुप्ता यांना अटक केली, असून त्यांना उद्या, 25 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

आत्तापर्यंत टीआरपी घोटाळा प्रकरणातील 14 जणांना अटक केली असून अटक झालेले दासगुप्ता 15 वे आहेत. मुंबई पोलिस पुढील तपास व कारवाई करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.