Breaking News : किवळे येथे डिव्हाडरवरील टायरला आग, धुरामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज – किवळे येथे एक्सप्रेसवेवर डिव्हायडरच्या कॉर्नरवर लावलेल्या टायरला आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास (Breaking News) आग लागली. टायरला आग लागल्याने धुराचे लोट उठले . ज्यामुळे नागरिकांनी घाबरून अग्निशमन दलाला फोन करून वाहनाला आग लागल्याची वर्दी दिली.

PMRDA : नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- एकनाथ शिंदे

त्या कॉलमुळे पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, थेरगाव अग्निशमन दल, प्राधिकरण अग्निशमनदल तसेच पीएमआरडीए, आयआरबी अशा चार गाड्या टायरची आग विझवायला पोहचल्या. दुरामुळे काही काळ ट्राफीक देखील विस्कळीत झाले होते. मात्र धुरामुळे वाहनाने पेट घेतल्याची अफवा पसरली होती.

यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. दुपारी तीनच्या सुमारास म्हणजे एक तासाच आग विझली.डिव्हायडर वरील वाळलेल्या गवताला आग लागल्याने त्या आगीच्या झळा डिव्हाडरला लटकवलेल्या टायर ला लागल्या व टायरने पेट घेतला. यात कोणतीही आर्थिक किंवा जिवीत हानी झाली नाही, अशी माहिती प्राधिकरण अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली (Breaking News) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.