Chakan News : मेनगेटचं लाॅक तोडत घरात घुसून साडेचार लाखांची चोरी  

एमपीसी न्यूज – बिल्डींगच्या मेनगेटचं लाॅक तोडत घरात घुसून कोयते व हत्यारांचा धाक दाखवून दोन लाख सत्तर हजार रोख रक्कम व एक लाख 85 हजार किंमतीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.6) खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी जनार्दन आत्माराम भाडळे (वय 36, रा. शेलपिंपळगाव, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच ते सहा अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन भाडळे हे व त्यांचे कुटुंबीय घरात झोपले असताना पाच ते सहा अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या मेनगेटचे लाॅक तोडून घरात घुसले. त्यांनी किचन व रुमच्या दरवाजांची तोडफोड केली. हातातील कोयते व हत्यारांचा धाक दाखवून दोन लाख सत्तर हजार रोख रक्कम आणि एक लाख 85 हजार किंमतीच्या दागिन्यांची चोरी केली. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.