Brett Lee Likes ‘This’ B’wood Actress: ब्रेट ली फिदा आहे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीवर

Brett Lee Likes 'This' B'wood Actress गाण्याचा चाहता असणारा ब्रेट ली याने दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या साथीने गाणी देखील गायली आहेत.

एमपीसी न्यूज – भारतात दोन गोष्टी सर्वांत जास्त चर्चिल्या जातात, एक म्हणजे बॉलिवूड आणि दुसरे म्हणजे क्रिकेट. आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हे समीकरण फार जुनं आहे. अगदी शर्मिला टागोर ते टायगर पतौडी यांच्यापासून ते आजच्या विरुष्काच्या प्रेमप्रकरणाचे अनेक किस्से आतापर्यंत आपण ऐकले आहेत. अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नही केलंय. तसेच आयपीएलमुळे अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू एकत्र आलेले आपण पाहिले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने नुकतेच त्याला आवडणारी बॉलिवूड मधील अभिनेत्री कोण हे एका मुलाखतीत सांगितले आहे. आणि अर्थातच त्यात विशेष असं काही नाही. ब्रेट लीला त्याच्या आयपीएल संघाची मालकीणच जास्त आवडते.

म्हणजे कोण काय, अहो ती म्हणजे प्रीती झिंटा. प्रीती झिंटा ही ब्रेट लीची बॉलिवूडमधली आवडती अभिनेत्री आहे. एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट लीने हा खुलासा केला आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलेल्या प्रीती झिंटाने नंतरच्या काळात आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सह-मालकी स्वीकारली आहे. तर ब्रेट लीने आयपीएलमध्ये काही हंगाम प्रीतीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचंही प्रतिनिधत्व केलं आहे.

गाण्याचा चाहता असणारा ब्रेट ली याने दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या साथीने गाणी देखील गायली आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या ब्रेट लीने 76 कसोटी, 221 वन-डे आणि 25 टी-20 सामन्यांत आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. 2015 साली ब्रेट लीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.