Hinjawadi : घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा उघडा असताना घरात प्रवेश करून बेडरुममधील सोन्याची चैन व पेंडंट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी एलएमडी चौक येथे उघडकीस आली.

प्रिती अतुल देशमुख (वय 38, रा. एलएमडी चौक, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलएमडी चौक येथील लिजर अपार्टमेंट सोसायटीमध्ये राहतात. 4 ते 18 सप्टेंबर या कालावधीत घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला. घरातील बेडरुमध्ये ठेवलेली सोन्याची चैन व पेंडंट असे 1 लाख 67 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.