Brig. Hemant Mahajan : चुकवू नका… सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी!

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘रक्षक मातृभूमीचे’ हा ‘सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी’ या विषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम होणार आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या मंगळवारी (10 मे) दुपारी ठीक बारा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन (Brig. Hemant Mahajan) हे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. एमपीसी न्यूज व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. 

राष्ट्रीय सैनिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, वेटरन्स इंडिया, इंडियन एक्स सर्व्हिसमन लिग, प्रांत पोलीस संघ, सालासार हनुमान प्रचार समिती, खान्देश मराठा मित्र मंडळ आदी संस्था या कार्यक्रमाच्या सहसंयोजक आहेत. ऑर्बिटल उद्योगसमूह, एस. ए. आर. इंडस्ट्रीज व अॅग्रोफिल्ड हे कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत. याखेरीज फाईन इक्व्युपमेंट इंडिया प्रा. लि. व पेटकर इंजिनिअर्स यांचेही कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले आहे.

भारतीय लष्करातील नामवंत निवृत्त अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन (Brig. Hemant Mahajan) हे उपस्थित विद्यार्थी व पालकांना लष्कराच्या विविध विभागांची तसेच लष्करी संस्थांची माहिती देणार आहेत. लष्करी सेवेत जवान ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणारी प्रवेश प्रक्रिया कशी असते? सशस्त्र सेना, नौदल, हवाई दल, निमलष्करी संस्थांमध्ये भरती कशी होते? निवड प्रक्रियेसाठी कोणते निकष लावले जातात, याबाबत ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

मेजर जनरल जयाप्रसाद नायर हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यक्रमाचे प्रायोजक ऑर्बिटल ग्रुपचे संचालक प्रकाश बिचे, एसएआर इंडस्ट्रीजचे संचालक अतुल इनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कीर्तीचक्र विजेते सुभेदार संतोष तानाजी राळे हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्यांचाही या वेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. देशासाठी हौतात्म्य पत्करलेले शहीद जवानांच्या वीरपत्नींचाही प्रातिनिधीक सन्मान करण्यात येणार आहे. त्यात मंगल तुळशीराम साळुंके व यशोदा केशव गोसावी यांचा समावेश आहे.

Rakshak Matrubhumiche

 

आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी असंख्य वीरांनी योगदान दिले आहे. भारतमातेचे स्वातंत्र्य चिरंतन राहण्यासाठी अशाच शूर, धाडसी, लढवय्या तरुण-तरुणींची देशाला गरज आहे. सशस्त्र सेना दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरूण-तरुणींना त्याबाबत (Brig. Hemant Mahajan) योग्य मार्गदर्शन व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एमपीसी न्यूजने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती एमपीसी न्यूज माध्यमसमूहाचे मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी दिली.

सशस्त्र सेना दलात दाखल होऊन मातृभूमीची सेवा करू इच्छिणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

IIM Campus : महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पिंपरी-चिंचवडमध्ये हा कार्यक्रम होत असला तरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळी शैक्षणिक आर्हता असलेले तरुण-तरुणींनी पहिल्या दोन दिवसांतच नावनोंदणी केली आहे.

कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी 9960562828 या मोबाईल फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.