Pimpri : अॅस्पायर चषक 2023 मध्ये इन्फ्ंटस एफसी, आर्यन्स ब संघांचा चमकदार विजय

एमपीसी न्यूज : द्वितीय-तृतीय श्रेणीच्या अॅस्पायर चषक 2023 (Pimpri) फुटबॉल स्पर्धेत इन्फंटंस एलाईट एफसी आणि आर्यन्स एस.सी. ब संघांनी चमकदार विजयासह आपली आगेकूच कायम राखली. 

पिंपरी येथील डॉ. हेडगडेवार मैदानावर झालेलया सामन्यात शुक्रवारी इन्फटंस एफसी संघाने साई एफसी संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. सॅम्युएल डॅनिएलने 17 व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सातच मिनिटांनी 24 व्या मिनिटाला गोल करून सयद तल्हाने संघाची आघाडी भक्कम केली. पुढे हीच आघाडी कायम राखत इन्फटंस एफसी संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर आयर्न्स एस.सी. संघाने सुखाई एफसी संघावर 3-0 असा सहज विजय मिळविला. सुखाई एफसी संघाने गोल करण्याच्याअनेक संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, त्याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. सुखाईच्या आक्रमक खेळाडूंना मारलेल्या किकमध्ये अचूकतेचा अभाव असल्याने त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.(Pimpri) याचा फायदा आर्यन्सने उठवला. अभिषेक गोखलेने ७व्या मिनिटाला गोल करून खाते उघडले. त्यानंतर उत्तर्धात आर्यन्सने आपली गोलसंख्या वाढवली. ओमकार राणेने 44 व्या, तर श्रेयश राऊतने 48 व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय साकार केला.

 

निकाल –

इन्फंटस एलाईट एफसी 2 (सॅम्युएल डॅनिएल 17 वे, सयद तल्हा 24 वे मिनिट) वि.वि. साई एफए 0

 

आर्यन्स एस.सी. ब 3 (अभिषेक घोडके 7वे, ओमकार राणे 44 वे मिनिट, श्रेयश राऊत 48 वे मिनिट) वि.वि. सुखाई एफसी 0

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.