Pimpri News : यापुढे कामाचा कालावधी व मुदतवाढीच्या कारणांसह प्रस्ताव आणा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची विकासकामे मुदत पूर्ण होत नसल्याने अधिका-यांकडून सातत्याने मुदतवाढीचे प्रस्ताव मान्यतेसाठी आणले जातात. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी मुदतवाढीचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यासाठीची कार्यपद्धती आखून दिली आहे. कामाचे नाव, प्रथम, द्वितीय मुदतवाढ, कामाचा आदेश क्रमांक, मुळ कावाधी पासून-कधीपर्यं, मुदवाढीची कारणे या फॉर्म्याटमध्येच अधिका-यांना मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.

महापालिकेच्या विविध विभागामार्फत दरवर्षी विविध विकास कामे व इतर कामांच्या निविदा प्रसिद्ध करुन कामे ठेकेदारामार्फत करुन घेतली जातात. त्यापैकी काही कामे ही ठराविक वेळेत पूर्ण होतात. तर, काही कामांना विविध कारणास्तव मुदतवाढी मिळण्याबाबतचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केले जातात. परंतु, विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या अशा प्रकारच्या प्रस्तावामध्ये संबंधित मुदतवाढीची कारणे, सदरची मुदतवाढी ही प्रथम आहे किंवा त्यांनतरची आहे. याबाबत स्वयंस्पष्टता दिसून येत नाही.

त्यामुळे भविष्यात मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करताना कामाचे नाव, प्रथम, द्वितीय मुदतवाढ, कामाचा आदेश क्रमांक, मुळ कावाधी पासून-कधीपर्यं, मुदवाढीची कारणे या फॉर्म्याटमध्येच प्रस्ताव सादर करावेत. या परिपत्रकाचे सर्व संबंधितांनी काटेकोरपने पालन करावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.