Rohit Pawar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणा – रोहित पवार 

Bring underworld don Dawood Ibrahim to India- Rohit Pawar.

एमपीसी न्यूज – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचे स्वतः पाकिस्ताने कबुली दिली आहे. आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केली आहे. 

पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे.

पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटनांवर, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत दाऊद इब्राहिमचा पत्ता देण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा पत्ता हा ‘व्हाइट हाउस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन, कराची’ असा देण्यात आला आहे.

मागील अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला होता. आता मात्र, ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.

त्यामुळे आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.