Sangvi : चोरटयांनी महादेव मंदिरातील दानपेटी फोडली

एमपीसी न्यूज – महादेव मंदिराचा लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना पिंपळे गुरव गावठाण येथे शुक्रवारी उघडकीस आली.

पुरुषोत्तम हरिभाऊ वाघमारे (वय 44, रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, पिंपळे गुरव गावठाण) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव गावठाण येथे महादेव मंदिर आहे. त्या मंदिरात फिर्यादी पुरुषोत्तम वाघमारे पुजारी म्हणून काम करतात. गुरुवारी वाघमारे यांनी मंदिराचा दरवाजा बंद केला. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात ठेवलेली दानपेटी फोडली. दानपेटी मध्ये असलेली सुमारे एक हजार रुपयांची रक्कम चोरटयांनी चोरून नेली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.