मंगळवार, जानेवारी 31, 2023

Bavdhan News : बावधन येथे वेश्या व्यवसाय प्रकरणी दलालास अटक

एमपीसी न्यूज – महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) सायंकाळी भूगावरोड बावधन येथे करण्यात आली.

प्रकाश मनबहादुर क्षेत्री (वय 30, रा. भूगावरोड, बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : ‘ई पॉस मशीन’च्या अडचणीबाबत लवकरच तोडगा – रविंद्र चव्हाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास भूगाव रोड वरील एका लॉजवर सापळा लावून आरोपीला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news