Akurdi : खंडोबा माळ चौकात सिग्नलवर बीआरटी बस बंद

एमपीसी न्यूज – इंजिन गरम झाल्याने आकुर्डी येथे बीआरटी मार्गात बस बंद पडली. आज (मंगळवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर हा प्रकार घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पीएमपीएमएल बस क्रमांक 42 ही बस कात्रज येथून निगडीकडे जात होती. बस आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर आली असता बसचे इंजिन गरम झाल्याने बस अचानक बंद पडली. त्यावेळी बस पूर्ण भरलेली होती. बस वाहकाने सर्व प्रवाशांची दुस-या बसमध्ये गंतव्य स्थळी जाण्याची सोय केली. गरम झालेली बस इंजिन थंड होईपर्यंत तिथेच थांबणार असल्याची माहिती बस चालकाने दिली.

वारंवार बंद पडणा-या बसकडे पीएमपीएमएल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. अशा वेळी आहे त्या व्यवस्था डबघाईला आलेल्या पाहायला मिळत आहेत. आहे ती व्यवस्था न सुधारता पुढील पीएमपीएमएल कितपत सुरक्षित आणि आरामदायी असतील, असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.