शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Pune News : BRTS ला दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन : ऍड. वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – शहरतील वाहतूक कोंडीसाठी BRTS ला दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन आहे. तो शहरांच्या शाश्वत विकासाच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करणारा आहे. शहरांच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने BRTS कॉरिडॉर संपुष्टात येऊ नये अशी माझी व माझ्या सारख्या अनेक पुणेकरांची ठोस मागणी आहे. याउलट BRTS अधिक सक्षम कसे बनवता येईल,(Pune News) बसेसची संख्या आणि त्याच्या फेऱ्या कश्या वाढवता येतील, BRTS च्या पायाभूत सुविधा कश्याप्रकारे सुधारता येतील यावर व्यापक पावले उचलणे गरजेचे आहे, असे खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे. 

बीआरटीएस बंद करण्याच्या विरोधात विक्रम कुमार आयुक्त, ओमप्रकाश बोकारीया (चेअरमन-डायरेक्टर PMPML), अमिताभ गुप्ता (CP) यांना पत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून, पुणे पोलीस आयुक्तांसह अनेक नागरिकांकडून पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी BRTS बंद करण्यासंदर्भात मागण्या केल्या जात आहेत.

पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे – खाजगी वाहनांची संख्या वाढत आहे – पुणे शहरात सध्या कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही – पुण्यातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे हा एकमेव उपाय आहे.(Pune News) लोकांना खाजगी वाहनांपासून दूर राहण्यास आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आपल्याला कार्यक्षम आणि शाश्वत Multi-modal वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.

आज, BRTS बसचे जाळे आणि एकूण फेऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. या प्रणालीत आणखी बसेसचा समावेश करण्याची गरज आहे. BRTS मार्गाचे बसस्थानक, संकेत फलक आणि प्रवेश यासारख्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Pune News : कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

BRTS चे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये – गर्दीच्या दरम्यान कॉरिडॉरमुळे वाहतूक कोंडीविना सुरळीत, सुलभ व सुरक्षित प्रवास. आपल्या निर्धारित ठिकाणी वेळेवर पोहचता येते.(Pune News) यापूर्वीच्या अनेक सर्वेक्षणांतून असे दिसून आले आहे की BRTS बसमधून प्रवास करणारे लोक त्यांच्या पूर्वीच्या प्रवास पद्धतीपेक्षा अधिक समाधानी आहेत. कमी जागेत मोठ्या संख्येने लोकांना वाहून नेण्याची क्षमता BRTS मधे आहे, यामुळे राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण (2008) (NUTP) च्या उद्देशाप्रमाणे आहे.

पर्यावरणीय दृष्टीकोनातून, BRTS च्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे ‘ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे’ होणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात व पर्यायाने शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. गेल्या काही वर्षात हवामान बदलाच्या गंभीर परिणामाना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.(Pune News) यापुढे विकास कामे करीत असताना हरितवायू उत्सर्जन (Green House Gases) कमी करण्याच्या दृष्टीकोनातूनच पाहावे लागणार आहे. जगभरातील अनेक शहरांनी आपल्या शहरांचा  शाश्वत विकास करण्याच्या  दृष्टीने पावले उचलली आहेत. ज्यामध्ये, खाजगी वाहतुकीचा कमीत कमी वापर करून सार्वजनिक वाहतूकीचा वापर, पायी चालणे आणि सायकल चालविण्यास प्रोत्साहित केले आहे. पुण्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि पुढारलेल्या विचारसरणीच्या शहराने याच अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

Latest news
Related news