BS 6 Vehical – बीएस-6 प्रकारातील चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये होणार बदल; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय

Changes in the number plates of BS-6 type four-wheelers; Decision of the Ministry of Road Transport and Highways

एमपीसी न्यूज – बीएस-6 प्रकारातील चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटवर बदल करण्यात आला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि सीएनजी वाहनांवर निळ्या तसेच डिझेलवर चालणा-या वाहनांवर केशरी रंगाचे स्टिकर लावले जात होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. त्या स्टिकरवर नवीन आदेशानुसार एक सेंटीमीटर जाडीची हिरवी पट्टी लावणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 5 जून 2020 रोजी याबाबत आदेश जरी केले आहेत.

कोणत्याही इंधन प्रकारच्या बीएस-6 वाहनांसाठी नोंदणी तपशील असलेल्या सध्याच्या पेट्रोल आणि सीएनजी वाहनांवर हलक्या निळ्या रंगाचे आणि डिझेलच्या वाहनांवर केशरी रंगाचे स्टिकर लावले जात होते.

आता त्या स्टिकरच्यावर एक सेंटीमीटर जाडीची हिरवी पट्टी लावणे बंधनकारक केले आहे.

बीएस- 6 उत्सर्जन मानके 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहेत. बीएस- 6 ही प्रणाली कठोर आणि स्वच्छ उत्सर्जन मानके प्रदान करते.

ही प्रणाली जगभरातील उत्सर्जन मानकांना अनुसरून तयार करण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उत्सर्जन मानकांसाठी वाहनांवर वेगळी ओळख असण्याची पद्धत आहे. त्या अनुषंगाने भारतात देखील ही पद्धत स्वीकारण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.