Pimpri News: नवोदित फुटबॉलपटूंचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील नवोदित फुटबॉलपटूंनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. क्रीडा क्षेत्रात देशातील मोदी सरकारने केलेल्या कार्यामुळे प्रेरित होवून आम्ही भाजपामध्ये सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे, अशा भावना या फुटबॉलपटूंनी व्यक्त केल्या आहेत.

मोरवाडी येथील भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात सोमवारी नवोदित महिला फुटबॉलपटूंनी भाजपाचे कमळ हाती घेतले. भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, शहराचे नेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा संकल्प यावेळी नवोदित महिला फुटबॉलपटूंनी केला. यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, शहर उपाध्यक्ष अर्जुन ठाकरे उपस्थित होते.

महिला फुटबॉलपटू पौर्णिमा मारोथीया, इशा मारोथीया, एकता जगवानी, नपूर लोंढे, डिंपल चौधरी, दिव्या चौधरी, रोशनी शिंपी, दिपाली आरोटे आदींच्या संपूर्ण टीमने भाजपात प्रवेश केला आहे.

भाजपने औद्योगिकनगरी असलेल्या शहराला ‘स्पोर्टस सिटी’बनवण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शहरात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणांची कामे सुरू झाली आहेत.

आगामी काळात शहरातील स्थानिक खेळाडुंना हक्काचे व्यासपीठ तयार करण्याच्या दृष्टीने भाजपाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि नवोदित भाजपासोबत जोडले जात आहेत, अशी प्रतिक्रीया संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.