Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

एमपीसी न्यूज : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (2023) सादर केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सामान्य लोकांना या बजेटमध्ये काय स्वस्त  आणि काय महाग झाले आहे ते जाणून घेऊया.

Budget 2023 Live Updates : नोकरदार वर्गाला मोदी सरकारची भेट; नव्या करप्रणालीत 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

स्वस्त झालेल्या वस्तू : 

1.  एलईडी टीव्ही
2. कापड
3. मोबाईल फोन
4. खेळणी
5. कॅमेरा लेन्स
6. इलेक्ट्रिक कार
7. हिऱ्याचे दागिने
8. बायोगॅसशी संबंधित गोष्टी
9. लिथियम पेशी
10. सायकल

महाग झालेल्या वस्तू : 

  1. सिगारेट
    2. दारू
    3. छत्री
    4. विदेशी किचन चिमणी
    5. सोने
    6. आयात केलेल्या चांदीच्या वस्तू
    7. प्लॅटिनम
    8. एक्स-रे मशीन

कापड आणि कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरांचा आकडा 21% वरून 13% पर्यंत करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.