बजेट बिघडवणारी बातमी ; CNG च्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

एमपीसी न्यूज : वाहनधारक आणि रिक्षा चालकांचे आर्थिक गणित बिघडवणारी बातमी समोर आली आहे. आजपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीएनजीच्या (CNG) दरामध्ये चार रुपये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या या किमतीमुळे सीएनजी वाहन चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मागील काही महिन्यांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा किंमती वाढल्याने वाहन चालकांना आता एक किलो सीएनजीसाठी 91 रुपये द्यावी लागणार आहे.
पुण्यात 1 एप्रिल 2022 रोजी सीएनजीचा (CNG)
दर 62.20 इतका होता. मात्र सातत्याने किंमती वाढत गेल्या आणि आज घडीला एक किलो सीएनजीसाठी 91 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच मागील पाच महिन्यात सीएनजीच्या किमती 29 रुपयांनी वाढले आहेत. वाढलेल्या या किंमती पाहता पेट्रोल डिझेलच्या दरात आणि चेंजच्या दरात फार जास्त तफावत राहिली नाही.
https://youtu.be/NfPJSr_DJ2E