Pune : स्थायी समिती अध्यक्षांचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा अर्थसंकल्प अंतिम टप्यात आला आहे. हा अर्थसंकल्प 7 हजार कोटींच्या आसपास जाणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रासने अर्थसंकल्प मांडणार असल्याचे समजते.

पुणेकरांच्या दृष्टीने काय महत्वपूर्ण प्रकल्प असतील याची उत्सुकता आहे. 2017 च्या अंदाजपत्रकात शिवसृष्टी, बालगंधर्व पुनर्विकास, 24 बाय समान पाणीपुरवठा योजना, विविध उड्डाणपुलासाठी तरतूद, 11 गावांच्या विकासासाठी तरतूद, असे अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी हेमंत रासने काय तरतूद करणार, याची उत्सुकता आहे.

स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 4 तर, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 असे सदस्य आहेत. यावर्षी प्रथमच 8 महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. या समितीवर आता खऱ्या अर्थाने महिलाराज्य स्थापन झाले आहे. पुणेकरांना विकासाची अपेक्षा आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like