Pune News : सराईत वाहनचोर अटकेत, 8 वाहनांसह 11 स्मार्टफोन जप्त,

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज : रेल्वे खात्यात नोकरी लावण्याच्या आमिषाने नागरिकांना भेटायला बोलावून त्यांची वाहने आणि मोबाइल चोरणा-या सराईताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 8 वाहने आणि 11 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. विलास जावळे (रा. रामटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावमध्ये सिक्युरिटीत काम लावून देण्याच्या आमिषाने चोरट्याने दोघा तरूणांकडून दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी तरूणांची चोरी करणारा पुणे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती कर्मचारी सागर घोरपडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विलासला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने कोंढवा, हडपसर, मार्केटयार्ड, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या  हद्दीतून 8 वाहने आणि 11 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, हरीष मोरे, सागर घोरपडे, अनिल कुसाळकर, किरण जाधव, किरण तळेकर, रूपेश पिसाळ, वैâलास डुकरे यांच्या पथकाने केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.