Pune Crime News : बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडची रवानगी येरवडा कारागृहात

Builder Amit Lunkad sent to Yerawada Jail.

एमपीसी न्यूज- आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. 

अमित लुंकड यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संजय विलास होनराव (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. लुंकड यांनी जामिनीसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज उद्या दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या जामिन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय होनराव यांना अमित लुंकड यांची फार्म असलेल्या लुंकड रियालिटीने गुंतवणुकीवर प्रतिमहिना पंधरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे होनराव यांनी तब्बल 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु लुंकड रियालिटी फर्म कडून होनराव यांना पंधरा टक्के परतावा न देता त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करतात सोमवारी रात्री अमित लुंकड यांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.