Pune Crime News : बिल्डर अमित लुंकडने फसवणूक केल्याचा आकडा 50 कोटीवर

पस्तीस गुंतवणूकदारांच्या पोलिसात तक्रारी

एमपीसीन्यूज : गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. त्या प्रकरणाचा आता आणखी एक मोठी अपडेट हाती आली असून फसवणुकीचा आकडा 50 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचला आहे.

फसवणूक झालेल्या आणखी 35 तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

अमित लुंकड यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संजय विलास होनराव (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.

संजय होनराव यांना अमित लुंकड यांची फार्म असलेल्या लुंकड रियालिटीने गुंतवणुकीवर प्रतिमहिना पंधरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे होनराव यांनी तब्बल 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

परंतु, लुंकड रियालिटी फर्मकडून होनराव यांना पंधरा टक्के परतावा न देता त्यांनी गुंतवलेली मुद्दल रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.