Dehuroad : बांधकाम व्यावसायिकाची मध्यस्थीकडून चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – मूळ शेतक-यांकडून जमीन घेऊन ती विकसनासाठी देण्याचे आमिष दाखवून मध्यस्थीने बांधकाम व्यावसायिकाची 3 कोटी 92 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 2013 पासून 16 ऑगस्ट 2018 दरम्यान किवळे येथे घडला. 

अमित रमनभाई पटेल (वय ३४, रा. युमिया सोसायटी, सेक्टर नंबर दहा, भोसरी) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हरीश वादीया, कमला वादीया,

अश्विन वादीया (तिघे रा. गुरु स्मृती बिल्डिंग, रावेत, ता. हवेली) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल त्यांच्या भागीदारांसोबत बांधकाम व्यवसाय करतात. वादीया पिता पुत्रांनी मिळून त्यांना किवळे येथील 121 आर क्षेत्र मूळ जमीन मालकाकडून घेऊन विकसनासाठी पटेल आणि त्यांच्या भागीदारांना देण्याचे मान्य केले. त्यामुळे मूळ मालकांकडून जमीन खरेदी करण्यासाठी पटेल यांनी वादीया यांना वेळोवेळी 3 कोटी 92 लाख 50 हजार रुपये दिले. मागील पाच वर्ष वादीया यांनी चालढकल करण्याची उत्तरे दिली. आपली फसवणूक केल्याची बाब पटेल यांच्या लक्षात येताच त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.