Bullock cart race : सांगलीत रंगणार भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार

एमपीसी न्यूज : सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये भारतातील (Bullock cart race) सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून 7 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीमध्ये महिंद्रा थार, ट्रॅक्टर्स व मोटारसायकलींच्या बक्षीसांचा धुरळा उडणार आहे.

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र संपूर्ण भारतातील बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची आयोजन सांगली जिल्ह्यात करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये (ता. खानापूर) या शर्यतीचा थरार रंगणार असून 7 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

Infra Market : इन्फ्रा मार्केट’च्या मार्केटिंग टीमतर्फे नवीन प्लायवूडचे लाँचिंग

या बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 16 लाखांची महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.  (Bullock cart race) आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर बक्षीस होते व अन्य नंबरवरती येणाऱ्या बैलगाडा चालकांना काही बक्षीस मिळत नव्हते. मात्र या स्पर्धेत दुसऱ्या व तिसऱ्या नंबरच्या विजेत्यांना ट्रॅक्टर्स देण्यात येणार आहेत. चार, पाच व सहा नंबरवरती शर्यती संपवणाऱ्या विजेत्यांना मोटारसायकली देण्यात येणार आहेत. रुस्तुम ए हिंद असे या बैलगाडा शर्यतीचे नाव ठेवण्यात आले असून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनीही स्पर्धा आयोजित केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.