Pune Crime News : महागड्या सायकली चोरून ओएलएक्सवर विकणारे बंटी-बबली गजाआड

एमपीसी न्यूज : महागड्या सायकली चोरून त्या ओएलएक्स वर आणि परस्पर विकणाऱ्या बंटी बबली ला येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. ज्याची किंमत 41 हजार 500 रुपये इतकी आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस शिपाई नागलोत आणि पोलीस नाईक किरण घुटे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने पुणे-नगर महामार्गावरील वाडीया बंगला समोरून एका मुलीसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सायकल चोरल्याची कबुली दिली.

त्यातील मुलगी ही सज्ञान आहे तर मुलगा अल्पवयीन आहे. हे दोघेही मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरत असत. त्यानंतर याच सायकली ओएलएक्सवर आणि परस्पररित्या विकत होते. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1