Chinchwad : थेरगाव परिसरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – थेरगावमधील महाराष्ट्र कॉलनीमध्ये घरफोडी झाली. यामध्ये चोरटयांनी 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 6 ते 13 सप्टेंबर दरम्यान घडली.

पुष्पा नामदेव मोरे (वय 45, रा. महाराष्ट्र कॉलनी, मातोश्री हॉस्पिटल जवळ, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावमधील सर्व्हे नंबर 40/4/ब येथे मोरे यांचे घर आहे. 6 ते 13 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या उघड्या घरात प्रवेश केला. त्याने लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. यावरून मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.