Talegaon : घरफोडी करून दहा तोळ्यांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून दहा तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी नऊच्या सुमारास यशवंतनगर, तळेगाव स्टेशन येथे उघडकीस आली.

शारंगधर विलासराव पाटील (वय 41, रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 5) दुपारी साडेतीन ते शनिवारी (दि. 7) सकाळी नऊ या कालावधीत पाटील यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून एक लाख 60 हजार रुपये किमतीचे 104 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.