Pune News : पालिकेचे कोविड सेंटर फोडून चोरी

एमपीसी न्यूज : घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरट्यांनी कर्वेनगरमधील एक मनपाचे कोव्हीड लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून चोरी केली आहे.  

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात समर्थ सुभाष पवार (वय 20) या तरुणाने तक्रार दिली आहे. यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेचे कर्वेनगर येथील शाहू कॉलनी गल्ली क्रमांक एकमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र आहे. येथील तक्रारदार तरुण डाटा ऑपरेटर आहे. नेहमी प्रमाणे 23 ऑगस्ट रोजी रात्री कुलूप लावून त्यांनी हे केंद्र बंद केले. यादरम्यान चोरट्यांनी केंद्राचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच कॉम्प्युटर व इतर 51 हजार रुपयांचा ऐवज चोरला. मंगळवारी सकाळी तक्रारदार तरुण परत आला. त्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्याने लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.