Dehuroad Crime : झेंडेमळ्यातील बंगल्यात चोरी; नऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील झेंडेमळा येथे एका बंगल्यात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी 28 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

महेंद्र साहेबराव झेंडे (वय 38, रा. झेंडेमळा, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झेंडे यांचा देहुगावातील झेंडेमळ्यात बंगला आहे. त्यांचा बंगला कुलूप लाऊन बंद होता. शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसह ते रात्री नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. बंगल्यातून 28.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 9 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.