Kouthrud : दोन ठिकाणी घरफोडी; तब्बल 6 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पहिली घटना  24 ते 28 (मे) या दरम्यान महात्मा सोसायटी येथे घडली. दुसरी घटना स्टेट बँक स्टाफ कॉलनी शिवतिर्थनगर येथे मंगळवारी (28) पावणेतीन ते सव्वातीनच्या दरम्यान घडली.  

पहिल्या घटनेत ओंकार जोशी (वय 28, रा. कोथरूड) याने फिर्याद दिली आहे.

कोथरूड येथील कृष्णसागर सोसायटी लेन नं4 महात्मा सोसायटी येथे ओंकार यांचा फ्लॅट आहे. ओंकार फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 4 लाख 77 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला.

शिवतिर्थनगर येथील घटनाप्रकरणी सागर शिंदे (वय 32) याने फिर्यादी दिली आहे. सागर याचा राहता फ्लॅट काल मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास बंद करून कुलूप लावून बाहेर गेले असता, चोरट्यांनी फायदा उचलत कुलूप तोडून कपाटातील एक लाख तीन हजार 300 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.