Burglary cases : मोशी आणि माण येथे भरदिवसा घरफोडीच्या घटना, सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मोशी आणि माण मध्ये घरफोडीच्या घटना घडल्या असून हिंजवडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Burglary cases) या दोन्ही घटना भरदिवसा घडल्या असून यामध्ये सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

माण येथे झालेल्या घरफोडीत उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातून 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी बोडकेवाडी, माण येथे घडली.

सतीश संतोष साबळे (वय 27, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडा होता. फिर्यादी घरात काम करत असताना अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला.(Burglary cases)उघड्या कपाटाच्या लॉकर मधून 55 हजारांचे सोन्याचे गंठण, पाच हजारांचे मिनी मंगळसूत्र, पाच हजारांची अंगठी आणि 10 हजारांची एक अंगठी असे एकूण 75 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Raje Umaji Naik : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

तर मोशी येथील बोराटे वस्तीमध्ये सोमवारी (दि.19) भर दिवसा घरफोडी करून चोरटयांनी एक लाख 52 हजारांचे दागिने चोरून नेले.निलेश दत्तात्रय गुणवंते (वय 40, रा. बोराटेवस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सोमवारी कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला.(Burglary cases) लाकडी कपाटातून एक लाख 52 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.