Burglary crime : घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख 12 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.(Burglary crime) ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी एम के गायकवाड फार्म हाऊस, जांभे नेरे रोड येथे उघडकीस आली.

उमाशंकर चुडाप्पा राठोड (वय 52, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indrayani ghat : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त इंद्रायणी घाट स्वच्छता मोहिम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर गुरुवारी सायंकाळी साडेसात ते शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते.(Burglary crime) दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातून 28.67 ग्रॅम वजनाचे एक लाख 12 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.